विजय 'सिंघ' सोबत असावे
'देवी'त 'प्रतिभा' उजळ दिसावे
घरट्यात 'चिमण्या' आणि
गुहेत फक्त 'वाघ' बसावे....
संघ परिवार सोबत असावेत
असा आपला भास आहे,
ओरडणे आत्ता सोपे आहे...
सत्तेकडून 'गळफास' आहे...
इन'कम' टक्स ची नोटीस
किती दिवस धरील वेठीस?
खूप दमछाक होईल आपणास
आपटून या गार'गोटीस'....
अण्णांना झेड सुरक्षा
हे बिगुल वाजू लागले
दिवसा, कोण?, कोण?, म्हणाल
'मौनमौनसिंग', स्वप्ने पाहत बसाल...
मोर्चे दिवसा ढवळ्या निघावेत
रात्री फक्त कातडे निघावेत...
कायदे कानून संसदेत
आव्हान मात्र कोर्टातच असावेत...
स्वातंत्र्याचे डोहाळे सुरु झाले
'राष्ट्रध्वज' रस्त्यावर उतरू लागले ...
- सचिन धनुरे (सगध)